चंद्रपूर गोंदियात पहिल्यांदाच जूनमध्ये ४० च्या खाली घसरला पारा

जुलै महिन्याला काही दिवस बाकी असतानाच गुरवारी पहिल्यांदाच नागपूरसह विदर्भाचा पारा ४० अंशाचा खाली घसरला आहे. दिवसभर आकाशात ढगाचे आच्छादन पसरले होते चंद्रपूर व गोंदिया मध्ये सुध्दा रिमझिम पावसाने मान्सूनची सुरुवात झाली तर नागपूरकरांना मात्र गुरुवारीही डमट उकाड्याचा त्रास सहन करावाच लागला.



गोंदिया आणि चंद्रपूरसाठी गुरुवार आनंददायक ठरला गोंदियात दिवसभर २९ मि.मी. पाऊस पडला; तर चंद्रपुरात १३ मि.मी. पावसाची नोंद झाली दोन्ही शहरांत पारा ३८.२ अंश असला तरी पावसाने गारवा पसरला. अमरावतीत सर्वाधिक ३९.६ अंश तापमान होते.

बदलत्या वातावरणात नैऋत्य मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती निमार्ण झली आहे.नागपूरव व विदर्भात बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्राचा चक्रीय वादळ व कमी दाबाचे क्षेत्र निमर्माण झाल्याने मान्सूनच्या दोन्हानी शाखांतून पाऊस येतो. तशी वातावरणीय परिस्थिती निर्माण झाली असून २४ तारखेला मान्सून नागपुरात धडकेल असा निश्चित अंदाज आहे. त्यानंतर पुढीचे चार-पाच दिवस जोरदार सरी बरसतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.