चंद्रपुरात २०० खाटांचे रुग्णालय उभारणार, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची घोषणा!



केंद्रीय मंत्री दोन दिवस चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते, त्यांनी चंद्रपुरात विविध विषयांचा आढावा घेतला असता चंद्रपुरात कामगारांसाठी २०० खाटांचे रुग्णालय उभे करणार अशी घोषणा पत्रकार परिषद मध्ये दिली.कॉंग्रेस पक्ष ओबीसीविरोधी आहे कॉंग्रेस ने मंडळ आयोग रिपोर्ट लागू केला नाही.असा आरोपही त्यांनी केला.

राष्ट्रिय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री तथा पालक मंत्री सुधीर मूनगंटीवार, खासदार डॉ.कल्पना सैनी,आमदार संजय उके भाजप जिल्हाध्यक्ष ग्रामीण देवराव भोंगळे उपस्थित होते. 

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी  बंगालमध्ये मुस्लिमांचा समावेश ओबीसी समाजात चुकीच्या पद्दतिनी करत आहे. हंसराज अहिर यांनी हि बाब उघडकीस आणली तेलंगणात व राज्यास्थानात हाच प्रकार सुरु आहे. मोदी सरकारच्या काळात १५ शहरात मेट्रो जल रस्ते निर्माण केले, ७४ शहरात विमानतळ झाले, ७०० नवीन मेडिकल कॉलेज, ६३ हजार नवीन वैद्यकिय जागा, ७ आयआयएम, ३९९ नवीन विद्यापीठे निर्माण केली जगात. आज भारताची पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. २०१४ नंतर २ हजार किलोमीटर जंगल वाढले आहे, असेही यादव यांनी सांगितले आहे.