१ जुलैपासून कोअर क्षेत्रातील सफारी होणार बंद, तर बफर क्षेत्रात करता येणार जंगल सफारी..

नागपूर :- व्याघ्र प्रकल्पात (jungle safari) करण्यासाठी पर्यटकांची ओढ आहे मात्र नुकताच पावसाळा लागला असून व्याघ्र प्रकल्प फिरण्यायोग्य नसल्यामुळे सफारी जंगल बंद करण्याचा निर्णय वनविभाग दरवर्षी घेत असतो.त्यामुळे यंदा ही कोअर क्षेत्रातील जंगल सफारी बंद ठेवण्यात आली असून रस्त्याच्या परिस्थितीनुसार पर्यटकांना जंगलातील बफर भागात जंगल सफारी करता येणार नाही.

वाघ्र  प्रकल्पाच्या जवळील स्थानिक रोजगारांचा प्रश्न?

जंगलालगत असणाऱ गावखेड्यातील युवा पिढीला (jungle safari) च्या  माध्यमातून रोजगार मिळत असतो पावसाळ्यामुले जंगल सफारी बंद झाल्याने अनेक युवा पिढीत्यांचे रोजगार हरवले जाते. अशा परिस्थितीत स्थानीक गाईड जिप्सी चालकासह इतरही त्यावर आधारित असलेल्या व्यावसायकांचा विचार करून तसेच पावसाची स्थिती बघून किमान बफर क्षेत्रातील पर्यटन सुरु ठेवण्याचा विचार वनविभागाकडे असतो.

पावसाळ्याच्या हंगामात वाण्याप्रण्यांचा प्रजननाचा कालावधी असतो त्यामुळे (jungal safari) वन्यप्राण्यांचा हालचाली अभादित ठेवण्यासाठीच्या सूचना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात जंगल सफारी बंद ठेवली जाते.

यंदा पावसाची सुरवात जरी उशिरा झाली असली तरी जंगल क्षेत्रात बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाहि जवाळपास तीन महिन्यासाठी जंगल सफारी बंद ठेवण्यात आली.

१ जुलै पासून जंगल सफारी बंद ठेवण्यात आली आहे शिवाय या ठिकाणी ऑनलाईन पध्दतीने होणारी बुकिंग प्रक्रिया देखील बंद ठेवण्यात आली आहे. बफर झोनमध्ये रस्त्याची परिस्थिति पाहून (jungal safari) सुरु राहणार आहे पर्यटकांना प्रत्यक्ष सफारीच्या ठिकाणी येऊन बुकिंग करावी लागणार आहे. बफर मध्ये सकाळ ते सायंकाळ अशा पूर्णवेळेपर्यंत सफारी करता येणार असल्याची माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ.प्रभुनाथ शुक्ला यांनी दिली आहे.