Leopard attack video :- किंग कोब्रा आणि बिबट्या मध्ये झाली घमासान युद्ध







सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात तसेच सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडिओचे व्यासपीठ मानले जाते. दररोज आपल्याला नवनवीन अतरंगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असते अशातच काही व्हिडिओ मजेशीर तर काही थक्क करणारे असतात.

आपण या न्यूज च्या माध्यमातून बघू शकता सध्या एक सोशल मीडियावर किंग कोब्रा आणि बिबट्या मध्ये घामसान युद्धाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला आहे.(social media news)

बिबट्याला जंगलातील सर्वात भयंकर आणि खतरनाक शिकारी म्हणून ओळखला जातो बिबट्याला बघताच अनेकांच्या काळजाचे थरकाप उडून जाते मात्र किंग कोब्रा पण काही कमी नाही किंग कोब्र्याला बघताच अनेकांची हवा टाईट होते पण तुम्ही कधी बिबट्याला किंग कोब्राची स्पर्धा करताना पाहिलं का? बघितले नसेल तर जंगलातील हा दुर्मिळ क्षण लगेच पहा. (Leopard versus King cobra)

हा व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर  प्रचंड व्हायरल

बिबट्या आणि किंग कोब्राच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे (viral video) एका जंगलातील हा व्हिडिओ आहे यामध्ये एक बिबट्या झाडावर चढलेला दिसून येत आहे तर झाडाच्या खाली असलेल्या दुसऱ्या झाडाच्या खोडावर एक किंग कोब्रा फणा काढून बसलेला दिसतोय कोब्रा पाहताच बिबट्याची अगोदर हवा टाईट होते.

व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे बिबट्या कोब्रावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय बिबट्याला पाहून कोब्रा फणा काढतो अगदी काही सेकंदाचा युद्धाचा हा थरार कॅमेरात कैद झाला हा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर बघितलेला आहे.

बिबट्या आणि कोब्रा यांच्यातील घमासान युद्धाचा व्हिडिओ wildtrails.in या इंस्टाग्राम पेजवरून पोस्ट करण्यात आलेला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून यावर  अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे हा व्हिडिओ कुठे आणि कधी चित्रित करण्यात आला याची पुष्टी झाली नाही