तुम्ही कधी हा प्रकार बघितल काय? एकाच बॉलवर 2 वेळा Out झाला फलंदाज Strange incidents in cricket



Viral Cricket Video :क्रिकेट मध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही, परंतु अनेकदा हातात असलेला सामना आपण गमवताना बघितलय तर कधी कधी अशक्य वाटणारा विजय सुद्धा आपण मिळवताना बघितले आहेत.

सध्या दक्षिण आफ्रिकेत CSA T २० लीग सुरु आहे. या मध्ये काल डर्बन सुपरजाईंट आणि एमआय केपटाउन यांच्यातील सामन्यात मार्कस स्टॉइनीस 11 धावांवर बाद झाला. डर्बन सुपर जायंट्सच्या डावाच्या १५ व्या षटकात ऑली स्टोनने शॉर्ट पीच बॉल टाकला. या बॉल वर फटका मारताना स्टोयनीसचा तोल गेला आणि त्याची बॅट थेट स्टम्प वर जाऊन आदळली. हे इथवरच नाही थांबलं, स्टोयनीसने टोलवलेल्या बॉलवर स्क्वेअर लेगच्या फिल्डरने झेल घेतला. आणि त्यामुळे तो हिट विकेट आणि कॅच आऊट असं दोन्ही बाजूनी बाद झाला. हा विडिओ (Viral Cricket Video) पाहून तुम्हीही चकित व्हाल

क्रिकेट मध्ये अनेक गमतीजमती सुद्धा पाहायला मिळतात. अशीच एक गंमत आणि त्याहून महत्वाचे म्हणजे विचित्र पद्धतीने आऊट होतानाचा विडिओ व्हायरल होत आहे. मार्कस स्टोयनीस हा फलंदाज एकाच चेंडूवर २ वेळा आऊट झाला आहे. याबाबतचा विडिओ सुद्धा आपल्याला सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसत आहे.