मूल येथे २७ सप्टेंबरला शिंपी समाजाचा भव्य स्नेह मिलन सोहळा

मूल : शिंपी समाज संघटनेच्या वतीने शिंपी समाज स्नेह मिलन सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा सोहळा दुर्गा माता मंदिर सभागृह, चंद्रपूर रोड, मूल, जिल्हा चंद्रपूर येथे पार पडणार आहे.

या स्नेह मिलन सोहळ्यामध्ये समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्यासोबतच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात वधू-वर डिजिटल परिचय सोहळा, डिजिटल स्मरणिका प्रकाशन, सन २०२५-२६ च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सत्कार, तसेच सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

यासोबतच विविध क्षेत्रातील प्रतिभावंत महिलांचा विशेष सन्मान, सन २०२५-२६ मध्ये शासकीय तसेच निमशासकीय नोकरीत निवड झालेल्यांचा सत्कार आणि मान्यवरांचे मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील विवाह इच्छुक युवक-युवतींसाठी परिचयाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच समाजातील गुणवंत आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या सोहळ्यासाठी समाजातील सर्व शिंपी समाज बांधव-भगिनींनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शिंपी समाज संघटना, मूल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
निलेश दिलीप नंदगिरवार – ९४२२७३४५१०
संतोष रघुनाथ झुनझुनगार – ७५८८५४९००३
प्रशांत मधुकर गटलेवार – ९४०५१ ३५५०४