चंद्रपूर Chandrapur शहरातील जटपुरा गेट परिसरात एका वयोवृद्ध व्यक्तीला भरधाव वेगात येत असलेल्या ऑटो रिक्षा Auto Rickshaw चालकाने बेधडक उडविले, त्यात वयोवृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शहराच्या जटपुरा गेट परिसरात एक ऑटो भरधाव वेगाने येत होता, वयोवृद्ध व्यक्ती रस्ता ओलांडतानी दिसत असून सुद्धा ऑटोचालकाने आपल्या ऑटोवर नियंत्रण न मिळवता अक्षरशः बेजवाबदारपणे एका वयोवृद्ध व्यक्तीला जोरदार धडक दिली आणि तो वयोवृद्ध व्यक्ती उसळून एका दुचाकीच्या Two Wheeler चक्क्यांजवळ पडला, सुदैवाने त्याच्या अंगावरून गाडी गेली नाही त्यामुळे 65 वर्षीय प्रकाश खोडे (रा. जलनगर) सुखरूप बचावले
हा संपूर्ण अपघात सिसीटीव्ही कॅमेरात cctv Camera कैद झाला आहे. रिक्षा चालकाने बेजबाबदारपणे वाहन चालवल्याने हा अपघात घडल्याचे या व्हिडिओतून दिसून येत आहे. त्यामुळे त्या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे, याकडे वाहतूक शाखेचे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. शहरात काही नागरिक बेजाबबदार पणाने गाड्या चालवतात त्यामुळे, अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे, वाहतूक शाखा या समस्येकडे लक्ष देणार काय? असा प्रश्न आता निर्माण होताना दिसत आहे.