देशाच्या संसदेत थेट कुस्तीचा आखाडाच रंगला.संसदेतील खासदारांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांना लाथा-बुक्क्यानी मारहाण केली.एवढच नव्हे तर एकमेकांना उचलून जमिनीवर फेकले.त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हि घटना मालदीव देशाचा संसदेत घडली आहे.मालदीवचे नवे अध्यक्ष मुइज्जू हे गेल्या वर्षी निवडून आले आहेत.अध्यक्ष मुइज्जू यांच्या मंत्रिमंडळासाठी मालदीवच्या संसदेत मतदान होणार होते.
विरोधी पक्षांनी मतदानापूर्वी स्पीकरच्या खोलीत पोहोचून त्यांची भेट घेतली. मतदान रोखण्याची विनंती केली.पण,सभागृहात मतदान प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यामुळे विरोधक संतापले आणि त्यांनी स्पीकरच्या खुर्चीजवळ जाऊन गोंधळ घालण्यास सुरवात केली. विरोधकांनी मतदान पत्रिकाही हिसकावून घेत आपल्या ताब्यात घेतल्या.
अध्यक्ष मुइज्जू यांच्या समर्थक सदस्यांनीही दुसरीकडे घोषणाबाजी करायला सुरवात केली. त्यांनी विरोधी पक्षांचे सदस्य यांची मागणी खोडून काढत मतदानाची मागणी लावून धरली होती . कॅबिनेट मंत्र्यांना मान्यता द्यावी,अशी त्यांनी मागणी केली.या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरु झाली. काही क्षणातच त्यांचात हाणामारीत झाली
दोन्हीकडील सदस्य एकमेकांना शिवीगाळ करत आमनेसामने आले. यात काही खासदारांनी तर विरोधी पक्षाच्या सदस्यांना उचलून जमिनीवर आपटले. लाथा बुक्क्यांनी त्यांना मारहाण केली. त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. यामध्ये एक खासदार दुसऱ्याचा पाय ओढत असल्याचे दिसत आहे.
तीन मंत्री याआधीच निलंबित
मालदीवच्या तीन मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्याचे तिवस पडसाद भारतात उमटले होते. अखेर मालदीव सरकारने यांची गंभीर दखल घेत मंत्री मरियम शिउना, मलशा शरीफ आणि महझूम मजीद यांना निलंबित केले होते.
