बापरे पहिली पास व्यक्तीकडे मराठ्यांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी.



मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर काम करतांना दिसत आहे.महत्त्वाचं म्हणजे सरकारने मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण सुरू केले आहे.

Viral video - राज्य सरकार मराठा समाजाच्या सर्वेक्षणाची जबाबदारी एकीकडे शिक्षकांकडे सोपवली आहे त्यामुळे एन पेपरच्या काळात शाळांमध्ये शिक्षक दिसेनासा झाले आहे. तसेच खुर्च्या ही रिकाम्या पडल्या आहेत. दुसऱ्या बाजूला फक्त पहिली पास असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याकडे मराठा सर्वक्षणाचे काम देल्याचे  समोर आले आहे. त्यामुळे पहिली पास व्यक्तीवर सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण कसे मिळणार हा प्रश्न आता उद्भवत आहे.



सोशल मीडियावर मराठा समाजाचां सर्वेक्षणादरम्यानचा एक व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे नेमके या व्हिडिओमध्ये सर्वेक्षण करणारा एक अधिकारी बोलताना दिसत आहे महत्त्वाची बाब म्हणजे हा अधिकारीच पहिली पास आहे. आपल्याला यातलं काही कळत नाही असे व्हिडिओ मध्ये बोलताना दिसत आहे.