चंद्रपूर येथील दिपेश श्रीकांत सत्रे ची राष्ट्रीय अजीक्यपद खो-खो स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. काटोल (नागपूर) येथे ९ ऑक्टोंबर २०२२ ला ३२ वी सबज्युनीयर राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आलेली होती. या स्पर्धेत विदर्भातून मुले व मुली सहभागी झाले होते. या निवड चाचणीतून विदर्भाचा सबज्युनीयर मुले व मुली चा
संघ निवळण्यात आला
सातारा (कात्रज) येथे दि. २९ ऑक्टोंबर २०२२ ते २ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ३२ वि राष्ट्रीय खो-खो अजीक्यपद स्पर्धा होणार आहे सदर ३२ व्या सबज्युनीयर राष्ट्रीय अजीक्यपद स्पर्धेकरीता चंद्रपूर येथील क्रांतीज्योती बहुउद्देशीय क्रिडा मंडळ चंद्रपूर चा विद्यार्थी दिपेश श्रीकांत सत्रे साताऱ्याला पोहचला आहे अनेकाकडून शुभेच्छा दिल्या असून सर्व स्तरातून कौतूक करण्यात येत आहे.
