वाघालाही मात देईल असा प्राणी म्हणजे बिबट्या.बिबट्यानं शिकारीसाठी चाल केली, की समोरच्या प्राण्याचा खेळ खलास झालाच म्हणून समजयाचं! अशाच एका हरणाची बिबट्यानं ७ सेकंदात शिकार केली. याचा व्हिडीओ पाहून तु्म्हीही अवाक् व्हाल…
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, डबक्यात आधीच एक हरीणाचं पिल्लू पाणी पित होतं. या डबक्याशेजारी एक झाडं होतं त्यामुळे बिबट्याला ते पिल्लू दिसलं नाही. बरं, पिल्लाला बिबट्याची चाहूल लागली होती त्यामुळे ते दूर पळण्याच्या इराद्यानं मागे फिरलं. मात्र तेवढ्यात बिबट्याची नजर पिल्लावर पडली. मग काय बिबट्यानं क्षणाचाही विलंब न करता एका झडपमध्ये त्या पिल्लाला आपल्या जबड्यात पकडलं. बिबट्याच्या तावडीतून हरणाला सुटण्यास मिळाले की नाही हे स्पष्ट होत नाही. शिकारीचा हा व्हिडीओ पाहून नेटकरीही अवाक झाले आहेत. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
जंगलामध्ये प्राणी एकमेकांची शिकार करुन आपलं पोट भरत असतात. ते नेहमीच आपल्यापेक्षा कमी बलवान प्राण्यांची शिकार करतात. वन्य प्राण्यांचे असे शिकारीचे अनेक व्हिडीओ आत्तापर्यंत समोर आले आहेत.सोशल मीडियावर प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ धुमाकूळ घालत असतात
.png)