ऑनलाइन टी ट्वेंटी मॅच सट्टा खेळणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शोध पथकाची दोन वेग वेगळी कारवाई

*ऑनलाइन टी ट्वेंटी सट्टा खेळणे पडले महागात*




चिमूर पोलीस स्टेशन हद्दीतील वार्ड नंबर दोन वडाळा येथे दिनांक 03.11..22 ला पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी वर्ल्ड कप लाईव्ह क्रिकेट मॅच वर सट्टा लावण्याची माहिती स्थानिक गुंन्ये शोध पथकाला मिळाली

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शोध पथक घटनास्थळी जाऊन जुगार खेळणाऱ्या एक आरोपीस ताब्यात घेतले व त्याच्याकडून एकुन 35000 किमतिचे दोन मोबाईल हँडसेट जप्त केले

जुगार खेळणाऱ्या एका आरोपी विरुद्ध चिमूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला आहे सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी, पोनि बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरिक्षक मंगेश भोयर, अजय बागेसर, धनराज करकाडे पोका संदीप मुळे, प्रशांत नागोसे, चानापोका दिनेश अराडे यांनी केली..

तसेच 5.11.22 रोजी स्थानिक गुने शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुल पोलीस स्टेशन हद्दीतील वार्ड नंबर 14 मुल येथे सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्ध श्रीलंका टी ट्वेंटी लाईव्ह वर्ल्ड कप क्रिकेट मॅच वर जुगार खेळणाऱ्या दोन आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार मोबाईल हँडसेट एक एलईडी टीव्ही सेट टॉप बॉक्स कॅल्क्युलेटर टीव्ही रिमोट असा एकूण किंमत 48 हजार 405 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन मुल येते गुन्हा नोंद केला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी पोनि श्री.बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि अतुल कावळे पोहवा नितीन साळवे, पोहवा प्रकाश बलकी, नापोशी सुभाष गोहोकार, पोशी मिलींद जांभुळे, पोशी सतिश वागमारे यांनी केली..,