लाच - लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर चे नवे पोलीस उपअधीक्षक म्हणून मंजुषा भोसले यांची नियुक्ती



चंद्रपूर ; चंद्रपूर जिल्ह्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभगाचे (Anti corruption) उपअधीक्षक अविनाश भाभरे यांची बदली ठाणे येथे झाली असून त्यांचा जागेवर चंद्रपूर नवे पोलीस उपअधिक्षक म्हणून मंजुषा भोसले यांची नियुक्ती करणायत आली आहे.

चंद्रपूर चे नवे पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांची ओळख शिस्त प्रिया अधिकारी म्हणून आहे.जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकारी लाच मांगत असेल तर त्यांनी थेट तक्रार लाच लुचपत कार्यालात (Anti corruption) देण्याचे आव्हान त्यांनी केले आहे.

मंजुषा भोसले यांनी या आधी सिंधुदुर्घ, रत्नागिरी, रायगड तसेच दहशत विरोधी पथकामध्ये त्यांनी काम करत आपली यशस्वी कामगिरी पार पडलेली आहे. (Anti curruption Chandrapur ) आता त्यांना चंद्रपूर जिल्ह्याची जवाबदारी मिळाली असून जिल्ह्यातील पोखरलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे.