संपुर्ण प्रकरण या प्रमाणे आहे की, 3 जुलै ला सकाळी अंदाजे 10:30 वाजताच्या सुमारास चंद्रपुर शहरच्या महाकाली कॉलरी येथील आनंद नगर परिसरात राहणारे रोहित कोमदंडीवार हे गौतम नगर परिसरातून राहाणारे महाकाली मंदीरच्या मार्गावर मोबाईल फोन ने बोलत जात होता. त्याचवेळी मागील बाजूने आलेल्या 2 युवकांनी रोहीत चा मोबाईल हिचकावीत पळ काढला, त्यानंतर फिर्यादी ने तत्काळ शहर पोलिस स्टेशन मध्ये याबाबत तक्रार नोंदविली.
शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तपास हाती घेत त्या परिसातील सीसीटिव्ही फुटेज च्या सहय्याने आरोपी तन्वी कादिर बेग व शिवम उर्फ कट्या अनिल कुळकेलवार रा. भिवापुर वार्ड यांना गुन्ह्याच्या अवघ्या 2 तसानंतर अटक केली. आणि आरोपीकडून गुन्ह्यात वारपलेली दुचाकी किंमत 70 हजार व चोरी केलेला vivo कंपनीचा मोबाईल (Mobile) किंमत 10 हज़ार असा एकुण 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर यशस्वी कारवाई पोलिस अधीकक रवविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागिय पोलिस अधिकारी सुधिर नंदनवार व पोलिस निरिक्षक सतिशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक प्रमुख मंगेश भोंगळे, पोलिस उपनिरीक्षक शरीफ़ शेख, पोलिस कर्मचारी विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, जयंता चुनारकर, संतोष पंडीत, चेतन गज्जलवार, सचीन बोरकर, प्रमोद डोंगरे, इम्रान खान, इर्शाद खान, दिलीप कुसराम, खुशाल कावळे, व रुपेश रणदिवे यांनी पार पाडली.