अजितदादांचा बंड, पॉलिटिकल खिचडीचे काय होणार परिणाम? यामुळे अनेक प्रश्नांना उधानं...

राज्यात वर्षभराच्या अंतराने दोन भूकंप झाले. यापूर्वी जून महिन्यात पहिला भूकंप झाला.  24 जून रोजी शिवसेना पक्ष फुटला. त्याची स्क्रीप्ट अर्थातच अगोदरच लिहिण्यात आली होती. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वावात शिवसेनेला भागदड पडले. आणि पुढे तर शिवसेनाच हायजॅक (Hijack) झाली. त्यानंतर आता  राष्ट्रवादी पक्षात उभी फूट दिसत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात तिसरा घटक म्हणून या सकारमध्ये सामील झाले. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकरणात प्रथमच राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. 

महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा समावेश होता. शिवसेनेतील बंडीमुळे हे सरकार गडगडले. शिंदे आणि फडणवीस सरकार आले. आता राष्ट्रवादी तिसरा घटक म्हणून सहभागी झाले. यापुर्वीच महाविकास आघाडीत निवडणुकीवरुन आणि कार्यकर्त्यांच्या पक्षावरुन स्थानिक पातळीवर कुरबुरी होत्या. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत रस्सीखेच दिसून आली. 

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडाणुकीच्या तोंडवर तीन पक्षाचं सरकार अस्तित्वात आले आहे. निवडणुका तोंडावर आहेत. पण राज्यातील या खिचडीमुळे स्थानिक पातळीवर नवीन प्रश्न उभा राहिला आहे. यापुर्वीच्या घडामोडींमुळे राज्यातील तरुण कार्यकर्त्यांची एक कळी राजकराणात पुढच्या पायरीवर आली होती. या तरुणांना आमदारकीची स्वप्न पडत आहेत.

या नव्या राजकीय समिकरणामुळे एकाच मतदार संघात कधी काळी एकमेकांविरोधात उभी ठाकलेली मंडळी सत्तेत वाटेकरी झाली आहेत. त्यामुळे मतदार संघाची वाटणी होताना कोणाचा पत्ता कट होणार अशी चिंता लागली आहे. 

यापुर्वी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. त्यात तीन पक्षांचे सरकार होते यावेळी शिवसेना (Shivsena), भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे सरकार झाले आहे. लोकसभेच्या 48 आणि विधानसभेच्या 288 जागांसाठी आता तीनही पक्षातील उमेदवारांमध्ये चुरस होईल. स्थानिक पातळीवर कोणाचा दबदबा आहे? कोण लोकप्रिय आहे? कोण निवडूण येईल? तीन ही पक्षातील स्थानिक पातळीवरील नेते, कार्यकर्ते एकमेकांना मदत करतील का? अगोदर एकमेकांविरोधात लाढलेले आमदार कसे एकत्रित येतील असे प्रश्न या खिचडीमुळे उभे होत आहेत.