गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो चे दर गगनाला भिडले आहे. (Tomato Price Hike) काही ठिकाणी टोमॅटोचा भाव शतक पार झाले दरम्यान मध्यप्रदेशात टोमॅटो महाग झाल्यानंतर शहरातील मोबाईल शोरूम ऑपरेटरने ग्राहकांसाठी एक अनोखी ऑफर दिली आहे. या ऑफर ची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
मध्यप्रदेशात टोमॅटोच्या किमती वाढल्यानंतर मोबाईल शोरूम ऑपरेटर स्मार्ट फोनेवर (Smart Phone) दोन किलो टोमॅटो मोफत (Tomato Free) देण्याचे ऑफर आणली आहे अशोक नगर येथील भाजी मंडईत टोमॅटो १६० रुपये किलोच्या पुढे विकला जात आहे.
शहरातील अभिषेक मोबाईल शॉपीतील तरुण व्यवसायिक अभिषेक अग्रवाल यांनी सांगितले की, आजच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी. मोबाईल शोरुममध्ये विविध ऑफर (Offers) दिल्या जातात. अशा स्पर्धेच्या काळात जेव्हा अम्हाला कळले की, टोमॅटोचे भाव वाढले (Price) आहेत आहे आणि भाजी बाजारात टोमॅटो 160 रुपये किलोने विकला जात आहे, तेव्हा आम्ही स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो टोमॅटो मोफत (Free) देण्याचा निर्णय घेतला.
मोबाईल शोरुमचे मालक सांगतात की, जेव्हापासून त्यांनी दुकानात ही योजना लागू केली आहे, तेव्हापासून ग्राहकांची संख्या वाढली आहे, या काळात अनेक लोक येऊन विचारत आहे की, या दुकानात टोमॅटोचे ऑफर सुरु आहे, ती रोज आहे का? ग्राहाकांना(Customers) 50 किलो पेक्षा जास्त टोममॅटो ऑफर म्हणून देण्यात येणार आहेत. मात्र या ऑफर ची चर्चा सर्वत्र जोरदार रंगली आहे.
