पाहाटेच्या शपथविधीनंतर आता दुपारचा शपतविधी गाजणार...

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. आज सकाळपासून अजित पवारांच्या देवगीरी बंगल्यावर समर्थक आमदारांची बैठक सुरू होती. या बैठकीनंतर पवार राजभवनावर दाखल झाले आहे. 

त्यामुळे अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, यामुळे पुन्हा एकाद पहाटेच्या शपथविधीनंतर दुपारचा शपथविधी गाजणार आहे. पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप-प्रत्योराप झाले होते. 

पहाटेच्या शपथविधीनंतर ८० तासात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांचे सरकार पडले होते. मात्र, आता दुपारी अजित पवार शपथविधी घेणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे.

 शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फुट पडली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भुकंप झाला आहे. मात्र, आता पाहाटेच्या शपथविधीनंतर आता दुपारचा शपतविधी गाजणार आहे.