सोयाबीन पिकाची कापणी करण्याकरिता मजूर घेऊन जाणारे वाहन पलटी झाल्याने दोन महिला गंभीर तर आठ जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.
चिमूर तालुक्यात सोयाबीन कापणीला सुरुवात झाली आहे तेथील स्थानिक मजूर मिळत नसल्याने बाहेरून वाहनाने मजूर आणून सोयाबीन कापणी केली जात आहे. चिमूर तालुक्यातील सिरपूर नेरी मार्गावर सोयाबीन पिकाच्या कापणीसाठी मजुरांना नेत असताना एका चार चाकी वाहनाचा अपघात झाला.
गाडीमध्ये 12 मजूर होते 4 वाजताच्या सुमारास वाहनाचा टायर फुटल्याने वाहन पलटी झाली यामध्ये दोन मजूर गंभीर तर आठ मजूर किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.मात्र या अपघातात सुदैवाने कुठलेही जिवित हानी झाली नाही.अपघातातील जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
