बाबूपेठ बायपास रोडवर अनेकदा मोठ मोठे अपघात झाले आहे (Accident) अपघातात काही लोकांना आपला जीव सुद्धा गमवावे लागले तर काही जन अपघातात गंभीर जखमी झाले अशीच एक घटना २७ सप्टेंबर ला बाबूपेठ बायपास रोड वर घडली.बाबूपेठ बायपास रोडवर एक भीषण अपघात झाला होता त्या अपघातात तीन जणांचा जागीची मृत्यू झाला होता.बाबूपेठ बायपास रोडवर पडलेले मोठ मोठे खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहे या खड्यांमुळे अपघातात अनेकजणांचे जीव गेले तर काई गंभीर जखमी सुद्धा झाले आहे.नागरिकांनी प्रशासनाला अनेकदा पत्रव्यवहार निवेदन देले मात्र याकडे कोणीही लक्ष दिले नाई या समस्येला बघता प्रशासनाचे अलगर्जीपणाच म्हणावे लागेल अशी भूमिका सामान्य जनतेतून होत आहे त्यामुळे या अपघाताला कारणीभूत कोण असा प्रश्न आता बाबूपेठकर वासियांना पडला आहे.
मृतकांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची महिला कॉंग्रेस ची मागणी (Chandrapur)
बाबूपेठ बायपास वर अपघातात ३ प्रवाशांचे दु:खद निधन झाले (Demand From Statement) त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला मृतकांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी तसेच, बाबूपेठ बायपास वरील अपघाताला आमंत्रण देणारे मोठ मोठे खड्डे बुजवून स्ट्रीट लाईट बसवण्यात यावे या भागात सर्व्हिस रोड करण्यात यावे या प्रमुख मागण्या घेऊन चंद्रपूर शहर महिला कॉंग्रेस चे अध्यक्ष चंदाताई वैरागडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी विनय गौडा साहेबांना निवेदन देण्यात आले.या वेळी शालिनी भगत,माधुरी नक्षीने, हुसना खान, अशफिया खान, स्नेहल अंबागडे, उज्वला कार्लेवार,वैशाली येसेकर,लीला बुटले आदींची उपस्थिती होती
