वाघ बघण्यासाठी नशीब लागतो मात्र वाघ दिसला की माणूस घाबरून जातो पण चंद्रपूर जिह्यात असा एक प्रकार घडला कि तुम्ही पण ऐकून थक्क व्हाल.वाघ म्हटल्या नंतर अनेकांचे हातपाय लटपटू लागते असा एक थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला.
चंद्रपूर जिल्यातील चिमूर तालुक्यातील ताडोबा बफर भागात निमढेला गावातील हा थरारक व्हीडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे.निमढेला येथील विठ्ठल रुखमाय मंदिरात भाविकांची गर्दी व मंदिराच्या छतावर वाघ अशे दृश्य व्हिडीओ मध्ये दिसत आहे.मंदिराच्या छतावर वाघ चालत होता मंदिराच छत हे टीनाच असल्यामुळे भाविकांच्या निदर्शनात वाघ दिसून आला तेथील अनेकांच्या काळजात थरकाप उडाला.एवढाच नव्हे तर वाघ छतावर बराच वेळ थांबला होता.काही वेळातच छोटा मटका वाघ जंगलात दिसेनासा झाला वाघ तिथून निघे पर्यंत भाविकांनी आपला श्वास रोखून ठेवला होता.
चिमूर तालुक्यातील निमढेला बफरक्षेत्रात रामदेगी येथे विठ्ठल रखुमाय मंदिर आहे.या मंदिरात रोज भाविक भक्त येतात पूजा अर्चना करतात.पण त्यांना आज एक वेगळाच प्रकार बघायला मिळाला.कधी स्वप्नात पण असा प्रसंग ओढवेल अस त्यांना वाटल नाही.या ठिकाणी भाविकांची नेहमीच गर्दी असते मात्र वाघ मानव संघर्षाना बघाल मिळालेला नाही.
