झोपलेल्या मारुतीचे दर्शन करण्यासाठी निघालेल्या भक्तांना झाले वाघाचे दर्शन





चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा वाघासाठी प्रसिद्ध आहे चंद्रपूर जिल्ह्यात जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे अनेक पर्यटक वाघाचे दर्शन करण्यासाठी ताडोबा येतात. मात्र वाघ दिसणे हे सर्वांच्या नशिबात नसत ज्यांचा नशिबात असत त्यांना वाघ दिसताच त्यांच्या अंगाचा  थरकाप उढतो हे मात्र खर आहे.

पिंपळझोरा येथील प्रसिद्ध झोपलेला मारुती आहे यांचे दर्शन करण्यासाठी अनेक भक्तगण जात असतात.मात्र याच मारुतीचे दर्शन करण्यासाठी निघालेल्या मुपीडवार कुटुंबाला केसला घाट परिसरात वाघाने दर्शन दिले.
वाघ रस्ता ओलाडण्याचा मार्गावर होता मात्र रस्त्यांनी वाहने ये जा करत असल्यामुळे वाघ त्या ठिकाणी उभा होता. वाघ दिसताच लोकांनी वाहने थांबवून वाघाचे दर्शन केले त्यामुळे वाघा बरोबरच साक्षात मारुतीचे दर्शन झाल्याचे यावेळी सगण्यात आले.

वाघ दिसण्यासाठी नशीब लागते मग वाघ दिसला की अनेकांची हवा टाईट होत असते तर काही जणांचे हात पाय लटपटू लागते केसलाघाट परिसरात अनेकांना वाघ दिसला त्यामुळे नागरीकांनी वाहने थांबवून प्रत्यक्ष वाघाचे दर्शन केले वाघ दिसताच नागरीकांचा अंगाचा थरकाप उडाला हे मात्र खर. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला, आणि सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान वायरल होत आहे.