वरोरा नाका पुलावर भीषण अपघात



भीषण अपघात चंद्रपूर शहराच्या वरोरा नाका परिसरात एका ट्रकने तीन-चार चाकी वाहनाला चिरडले वरोरा नाका पूल अपघाताचा केंद्र बनला आहे. वरोरा नाका परिसरातून अरुंद असलेल्या रस्त्यावर उभ्या असलेल्या साई हेरिटेज जवळील गाड्या हे अपघाताला निमंत्रण देत आहे मात्र यावर स्थानिक वाहतूक पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे

वरोरा नाका परिसरात यापूर्वी मोठमोठे अपघात झाले होते मात्र अपघातात काही जणांना आपला जीव गमवावे लागला तर काही जणांना अपंगत्व आले याला जबाबदार कोण असा प्रश्न जनसामान्यातून विचारण्यात येत आहे.

वरोरा नाका पुलावरून ओव्हरलोड ट्रकची वाहतूक होत असते यापूर्वी सुद्धा एका ओवरलोड ट्रकने एका चार चाकी वाहनाला चिरडले होते मात्र त्यावेळी सुद्धा मोठी जीवित हानी होता होता टळली ओव्हरलोड ट्रक वर वाहतूक पोलीस  कारवाई का करत नाही याच्यामागे काही देवाण-घेवाण तर नाही ना असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे यावर उपप्रादेशिक परिवहन वाहतूक शाखा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असताना दिसून येत आहे असाच एक अपघात आज दुपारी दोन वाजता च्या दरम्यान घडला असून जळ वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने तब्बल चार चाकी तीन वाहनाला चिरडले त्यामुळे चार चाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेमुळे कुठलेही जीवितहानी झाली नाही