कायद्याच्याच बाजूने रहणारे जर कायद्याने कारवाई न करता पदाचा जोर वापरत असेल तर त्यावर पश्न निर्माण होणारच बेशिस्तीवर रोक लावण्यास कद्याच्या होशोबाने वेगवेगळ्या विभागाची वेगवेगळी पध्दत असते पण काही वेळा कायद्याची बाजू घेणारेच या नियमाचे उल्लंघन करतांना दिसत असतात असाच एक प्रकार ब्रम्हपूरीत घडला.
ब्रम्हपूरी पोलिस स्टेशन चे ठाणेदार सुधाकर अंभोरे यांनी एका ट्रॅव्हल्स चालकाच्या कानशिलात लावून त्यांच्या डोक्यावर दांडूक्याने प्रहार करीत त्याला रक्तबंबाळ केल्याची घटना सोमवारी ब्रम्हापूरी येथिल ख्रिस्तानंद चौकात घडली. गडचिरोली कडून नागपूर कडे जाणाऱ्या MH49AT3625 नंबरची ट्रॅव्हल्स रेल्वे फाटक बंद असल्याने थांबवली होती. दरम्यान ठाणेदार अंभोरे हे MH29AR8855 खासगी वाहनाने ब्रम्हपूरी कडे येत होते.
ट्रॅव्हल्स च्या डाव्या बाजूने कार पुढे नेत ट्रॅव्हल्स ला थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र ते गणवेशात नसल्याने ट्रॅव्हल्स चालक मोहन अडविकर यांनी ट्रॅव्हल्स त्या ठिकाणी न थांबवता ख्रिस्तानंद हॉस्पीटल चौकात थांबवली असता त्याला ठाणेदार अंभोरे यांनी कानशिलात लागवत दांड्या ने मारहाण केल्याचा आरोप पिडिताने केला आहे. मारहाणीची तक्रार ब्रम्हपूरी पोलिस स्टेशन (Police station) मध्ये दिली असता ती तक्रार घेतली नसल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी मार्फत पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या कडे केली आहे.
सेवानिवृत्त होण्याकरिता काही दिवसे शिल्लक असतांना हा प्रकार घडल्याने पुन्हा त्यांचा मारहाणीचा विषय समोर आल्याने पोलिस अधिक्षक काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लगले आहे.
