चंद्रपुरात लावण्यात आले अनाधिकृत बॅनर होर्डिंग्स याला जबाबदार कोण



चंद्रपूर शहर मनपाच्या हद्दीत बॅनर्स होड्रिंग्स स्टिकर्स परवानगी न घेता अनधिकृत लावणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. अनाधिकृत बॅनर होड्रिंग्ज स्टिकर्स ची तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान आढळून आलेले परवानगी नसलेल्या बॅनरची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आले आहे.

या दरम्यान काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फलक काडण्यात आले.या पुढे व्यवसायिकांनी बॅनर होड्रिग्स परवानगी घेऊन लावावे अन्यथा याला जवाबदार व्यवसायिकांना धरले जाईल अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

शहरात वाहतूक कोंडी अपघात आणि इतर समस्या उद्भवत आहे त्यामुळे या समस्याचे निराकरण करण्यासाठी या संपूर्ण समस्येला बघता महानगरपालिका प्रशासनाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे तर शहरातील सर्व बॅनर्स प्रिंटिंग व्यवसायिकाची बैठक घेण्यात आली यात काही सूचना सुद्धा देण्यात आले महानगरपालिकेच्या वतीने १२ नोव्हेंबरला ३ झोन मध्ये अनाधिकृत बॅनर्स होड्रिग्ज स्टिकर्स ची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान झोन क्रमांक १ मध्ये ३४ बॅनरची तपासणी करण्यात आली त्यापैकी १६ बॅनर्स परवानगी सह लावण्यात आले होते तर १८ बॅनर्स परवानगीशिवाय लावण्यात आले होते

झोन क्रमांक २ मध्ये १६ बॅनर्स परवानगी सह लावण्यात आले होते तर ४७ बॅनर्स परवानगीशिवाय लावण्यात आले होते झोन क्रमांक ३ मध्ये ५ बॅनर्स परवानगीसह तर १३ बॅनर्स परवानगीशिवाय लावण्यात आली होते महानगरपालिका हद्दीत जाहिरातीचे बॅनर स्टिकर्स होड्रिग्ज लावताना परवानगी घेऊन आकारण्यात येणारा कर भरणे आवश्यक असते मात्र अनेकदा कर न भरता व परवानगी हि न घेता बॅनर्स लावले जातात. या विरोधात आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. बॅनर्स लावताना त्याच्यावर परवानगी पत्राची प्रत प्रिंटर्स व्यवसायिक आस्थापनेचे नाव आणि कालावधी नमूद करण्यात यावा अशा सूचना देण्यात आले आहे.

परवानगीशिवाय बॅनर्स होल्डिंग स्टिकर्स लावणाऱ्या वर महानगरपालिका अधिनियमान्वये दंडाची तरतूद आहे असे बॅनर होड्रिग्ज स्टिकर्स काढून टाकण्याचा खर्चही संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्यात येईल अशा सूचनाही देण्यात आल्या