या स्पर्धेसाठी देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जवळपास 3 हजार, त्यांचे मार्गदर्शक, पंच, पालक, क्रिडा प्रशिक्षक आदी लोक सहभागी होणार आहेत. त्यांच्या भोजनाची आणि निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
या भव्य स्पर्धेसाठी बाॅलिवूडचा 'टायगर' सलमान खाननेही दिल्या शुभेच्छा
या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुध्दा शुभेच्छा दिल्या आहेत तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांना निमंत्रण दिलं
या 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपूर शहरातील उड्डानपूलावरील दिव्यांवर तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे. प्रमुख चौकांचे सौंदर्यीकरण झाले आहे. रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकावर सुर्यनमस्कारातील मुद्रा दर्शविणाऱ्या शिल्पाकृती बसविण्यात आल्या आहेत. रंगबिरंगी चित्रांनी भिंती रंगविण्यात आल्या आहेत.
याचबरोबर या स्पर्धेसाठी प्रसिध्द गायक कैलाश खेर यांच्या आवाजात थीम साँग song तयार करण्यात आले आहे. 'आओ चंद्रपूर, खेलो चंद्रपूर... ' असे शब्द असलेले हे गीत आहे जे विद्यार्थ्यांन बरोबरच समस्त जनतेत उत्साह निर्माण करत आहे. लक्षवेधक शब्द, जोशपुर्ण संगीत आणि कैलाश खेर यांचा भावगर्भित आवाज ही या थीम साँगची वैशिष्ट्ये ठरत आहेत.
सोबतच विविध रज्यातील खेळाडूंना जगप्रसिध्द ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची मोफत टायगर सफारी करण्याच्या सुचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिल्या होत्या, त्यानुसार पहिल्याच दिवशी 336 खेळाडूंनी टायगर सफारीचा आनंद घेतला.






