पोलीस ठाण्यात कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला बिबट्याने केली शिखार

 


पोलीस स्टेशन  मध्ये घुसला बिबट्या आणि पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच केली  बिबट्याने कुत्र्याची शिकार थरारक VIDEO व्हायरल

रत्नागिरीत बिबट्या पोलीस स्टेशनमध्ये शिरल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे चक्क बिबट्यांने पोलीस स्टेशनगाठत एका कुत्राची शिकार केली आहे .बिबट्या  कुत्र्याला घेऊन पोलीस स्टेशनमधून पसार झाला हा संपूर्ण प्रकार 

पोलीस स्टेशनमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला  आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

हि घटना रत्नागिरीतील राजापूर पोलीस ठाण्यात घडली होती .पोलीस ठाण्याच्या आत कुत्रे भटकत होते.त्यामुळे कुत्र्यांचा पाठलाग करताना  बिबट्या पोलीस स्टेशन च्या आवारात घुसला सुदैवाने बिबट्या पोलीस ठाण्यात घुसल्याचं लक्षात आल्याने पोलीस ठाण्यातील (ratnagiri police station) सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेकडे धाव घेतली. बिबट्याने कुत्र्याला पोलिस ठाण्याच्या आत पकडले. त्यानंतर अंगणाच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीच्या दिशेने, जिथे एक विहीर होती. त्या दिशेने बिबट्या निघून गेला.ही संपूर्ण घटना पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पोलीस ठाण्यात कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला



पोलीस ठाण्याच्या आवारात  सुमारे चार ते पाच कुत्रे होते. बिबट्याला पाहून ते सर्व घाबरत काही पोलीस ठाण्याच्या बाहेर पळाले तर एक कुत्रा पोलीस स्टेशन च्या आत रूम मध्ये  शिरला.याच रूम  मध्ये  बिबट्याही घुसला. व्हिडिओत इतर कुत्रे पळून गेल्याचे दिसून येतं आहे .

व्हिडिओमध्ये एका कुत्र्याच्या मानेला धरून बिबट्या पोलीस स्टेशनमधून बाहेर निघताना दिसत  आहे (Leopard Hunts Dog) बिबट्याने पोलीस ठाण्यातील एकाही कर्मचाऱ्यावर हल्ला केला नाही त्यामुळे  मोठी दुर्घटना टळल्याच दिसून येत आहे या घटनेमुळे पोलीस ठाण्यात कर्मचार्यांच्या अंगाला चागलाच घाम फुटला